पितृ पक्ष: श्राद्ध कर्मासंबंधी मनात येत असलेल्या काही प्रश्नांचे अचूक उत्तर

शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (10:19 IST)
1. श्राद्धकर्म करण्यासाठी दुपारची वेळच का श्रेष्ठ मानली गेली आहे ?
अशी आख्यायिका आहे की पितृपक्षात दुपारच्या वेळेस केले गेले श्राद्ध कर्म आपले पितृदेव सूर्याच्या प्रकाशातून ग्राह्य करतात. दुपारच्या वेळी सूर्य आपल्या संपूर्ण प्रभावाखाली असतो. या कारणास्तव आपले पितृ आपले जेवण चांगल्या प्रकारे ग्राह्य करतात. 
 
सूर्यदेव हे एकमेव या संपूर्ण सृष्टीतील प्रत्यक्ष देव मानले गेले आहे. ज्यांना आपण बघू व अनुभवू शकतो. सूर्य हे अग्नीचे स्रोत देखील आहेत. ज्या प्रमाणे देवांना जेवण देण्यासाठी यज्ञ करतात त्याच प्रमाणे आपल्या पितरांना जेवण देण्यासाठी सूर्याच्या किरणांना माध्यम मानले गेले आहे.
 
2. पिंड दानासाठी पिंड हे तांदुळानेच का बनवतात ? 
फक्त तांदूळच नव्हे, तर पिंड बऱ्याच प्रकारे बनवतात. जवस, काळे तीळ याने देखील पिंड बनवू शकतो. तांदुळाच्या पिंडाला पायस अन्न मानले आहे. यालाच पहिले प्रसाद मानले गेले आहे. 

तांदूळ नसल्यास जवाच्या पिठाचे पिंड बनवू शकतात. हे देखील नसल्यास केळी आणि काळ्या तीळाने पिंड बनवून पितरांना देऊ शकतात. 
 
तांदूळ ज्याला आपण अक्षत देखील म्हणतो म्हणजे जे भंगलेले नसावे. तांदूळ कधीही खराब होत नाही. त्यामधील असलेले गुणधर्म संपत नाही. तांदूळ हे थंड प्रकृतीचे असतात. आपल्या पितरांना शांती मिळावी आणि दीर्घकाळापर्यंत त्यांना या पिंडांपासून समाधान मिळावं, म्हणून पिंड तांदळाच्या पिठाचे केले जाते.
 
3. कावळा, गायी आणि कुत्र्याला पितृ पक्षात जेवण का दिले जाते?
सर्व पितरांचे वास्तव्य पितृलोकं आणि काही काळासाठी यमलोकात देखील असतं. 
पितृपक्षात यम बळी आणि श्वान बळी देण्याचे विधान आहे. यम बळी कावळ्याला आणि श्वान बळी ही कुत्र्याला दिली जाते. कावळ्याला यमराजांचे संदेश वाहक मानले आहेत. यमराजांकडे दोन कुत्रे देखील आहेत. याच कारणास्तव कावळ्याला आणि कुत्र्याला जेवण दिले जाते. गायी मध्ये सर्व देवी-देवाचे वास्तव्य मानले आहे. म्हणून गायीला देखील जेवायला दिले जाते.
 
4. श्राद्धकर्म करताना अनामिकेतच कुशा का घालतात? 
कुशा ही पवित्र मानली जाते. कुशा एक प्रकाराचं गवत आहे. निव्वळ श्राद्ध कर्मातच नव्हे, तर इतर देखील कर्मकांडात कुशा ही अनामिकेत धारण करतात. हे घातल्याने आपण पूजा आणि इतर कर्मकांडासाठी पावित्र्य होतो. 
 
कुशा मध्ये दुर्वांप्रमाणेच गुणधर्म आहेत. या मध्ये अमरतत्व औषधीचे गुण आढळतात, हे शरीरास थंडावा देते. आयुर्वेदात याला पित्त आणि अपच साठी उपयोगी मानले गेले आहेत. चिकित्साशास्त्र सांगतात की अनामिकेचा थेट हृदयाशी संबंध आहे. अनामिका म्हणजे करंगळी जवळचे बोट, त्या अनामिकेत कुशा घालतात जेणे करून पितरांसाठी श्राद्ध करताना शांत आणि सहज राहू शकतो, कारण हे आपल्या शरीरास थंडावा देते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती