Pitru Paksha 2019: श्राद्धाबद्दल महत्त्वाच्या गोष्टी, नक्की जाणून घ्या
वडिलाचं श्राद्ध पुत्राने करावं. पुत्र नसल्यास पत्नी, पत्नी नसल्यास सख्खा भाऊ श्राद्ध करू शकतो. एकाहून अधिक पुत्र असल्यास सर्वात मोठ्या मुलाने श्राद्ध कर्म करावं.
ब्राह्मणांचे भोजन झाल्यावर त्यांना सन्मानपूर्वक विदा करावे. ब्राह्मणांसोबत पितर असतात असे मानले गेले आहे. म्हणूनच ब्राह्मण भोज झाल्यावर कुटुंबातील सदस्यांना प्रसाद देण्याचा नियम आहे.
श्राद्ध तिथीच्या आधीपासूनच ब्राह्मणांना भोजनासाठी निमंत्रण करावे. भोजनासाठी आलेल्या ब्राह्मणांना दक्षिण दिशेत बसवावे.
मान्यतेनुसार पितरांना दूध, दही, तूप आणि मधासह तयार खाद्य पदार्थ आवडतात. म्हणून ब्राह्मणांच्या ताटात असे पदार्थ असावे.
भोजनातून गाय, कुत्रा, कावळा, देव आणि मुंग्यांचा भाग वेगळा काढून ठेवावा. नंतर हातात पाणी, अक्षता, चंदन, फुलं आणि तीळ घेऊन संकल्प करावा.
कुत्रा आणि कावळ्याच्या निमित्ताने काढलेलं भोजन त्यांनाच द्यावे. देव आणि मुंग्यांसाठी काढलेलं भोजन गायीला खाऊ घातला येऊ शकतं.
ब्राह्मणांच्या कपाळावर तिलक करून त्यांना कपडे, धान्य आणि दक्षिणा दान करून आशीर्वाद घ्यावा.
श्राद्ध कर्मात केवळ गायीचं दूध, तूप आणि दही वापरावं.
ब्राह्मण भोजन दरम्यान मौन राहावे. शास्त्रांप्रमाणे पितृ तेव्हाच भोजन ग्रहण करतात जेव्हा भोजन ग्रहण करताना ब्राह्मण मौन राहून आहार घेत असतील.
जर पितृ शस्त्र इतर कारणामुळे मृत्यू पावले असतील तर त्याचं श्राद्ध मुख्य तिथी व्यतिरिक्त चतुर्दशी तिथीला करावे.
श्राद्ध कर्मात ब्राह्मण भोजनाचे खूप महत्त्व आहे. जी व्यक्ती ब्राह्मणाविना श्राद्ध कर्म करतात, त्यांच्या घरी पितर भोजन करत नाही.
दूसर्यांच्या भूमीवर किंवा घरात श्राद्ध कर्म करू नये. वन, पर्वत, पुण्यतीर्थ अशा जागी श्राद्ध कर्म करता येऊ शकतं.
शुक्लपक्षात रात्री आपल्या वाढदिवसाला आणि एकाच दिवशी दोन तिथीचा योग असल्यास कधीही श्राद्ध कर्म करू नये.
धर्म ग्रंथानुसार संध्याकाळची वेळ देखील योग्य नाही. संध्याकाळी कधीही श्राद्ध कर्म करू नये.
श्राद्ध कर्मासाठी शुक्लपक्षापेक्षा कृष्ण पक्ष अधिक श्रेष्ठ मानला गेला आहे.
श्राद्धात या वस्तूंचा समावेश महत्त्वपूर्ण आहे- गंगाजल, दूध, मध, कुश आणि तीळ.
केळीच्या पानावर श्राद्धाचे भोजन केले जात नाही. यासाठी सोनं, चांदी, कांस्य, तांब्याचे भांडे उत्तम आहे. या व्यतिरिक्त पत्रावळ देखील वापरता येते.