साहित्य: १ लिटर घट्ट सायीचे दूध, १/४ कप तांदूळ, २ टेबलस्पून सुके मेवे कप, चिमुटभर केशर, १/४ टीस्पून वेलची पूड, २ टेबलस्पून चारोळी, १/४ टीस्पून जायफळ, २०० ग्रॅम्स साखर, १ टेबलस्पून तूप
कृती:
तांदूळ १ तास आधी धुवून ठेवा. नंतर मिक्सरवर सरभरीत वाटून घ्या.
१ टेबलस्पून कोमट दुधात केशर घालून ठेवा.
आता त्यात सुके मेवे, जायफळ, केशर घातलेले दुध मिसळून 5 मिनिटे उकळून घ्या.
नंतर गॅस बंद करून खीर गार होईपर्यंत मध्ये मध्ये ढवळत रहा म्हणजे साय येणार नाही.