एके दिवशी रामदास महाराज शिवाजी आणि आपल्या इतर शिष्यांसमवेत एका अरण्यातून जात असे. रात्री त्यांनी एका गुहेत आश्रय घेतले. सगळे निद्रासी असताना समर्थ जोराने विव्हळू लागले. शिष्यांनी विचारल्यास त्यांनी पोटातून कळ येण्याचे आणि पोट दुखत असल्याचे सांगितले. शिष्यांनी वेदना दूर करण्याचा उपाय विचारल्यास समर्थांनी उपाय सांगितल्यावर सर्व शिष्य मात्र हैराण होऊन एकमेकांना बघू लागले. कारण समर्थ म्हणाले की यावर सिंहिणीचे दूध हाच एक उपचार आहे. ढोंगी भक्त उपाय करणार तरी कसे. सर्व शांत होते.
परंतू हे ऐकून मनात कुठलीही शंका किंवा भीती न बाळगता शिवाजी महाराज गुरुजींचा तुंबा घेऊन सिंहिणीच्या दुधाच्या शोधात निघाले. चालत असताना त्यांना एका गुहेत सिंहिणीची गर्जना ऐकू येऊ लागली. त्या गुहेत गेल्यावर त्यांना दिसले की एक सिंहिणी आपल्या लेकरांना दूध पाजत आहे. ते बघून त्यांनी त्या सिंहिणीस हात जोडून विनवणी केली "माते मी आपणांस किंवा आपल्या शावकांना मारण्यासाठी आलो नसून माझे गुरु आजारी आहे आणि त्यांना आपलेच दूध बरं करू शकतं आणि मी केवळ ते घेण्यासाठीच येथे आलो आहोत. आपल्यास वाटले तर आपण माझ्या गुरुंना बरं वाटल्यावर माझे भक्षण करू शकता.