Shiv Jayanti Wishes In Marathi शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (05:29 IST)
सिंहाची चाल… 
गरुडाची नजर.. 
स्त्रियांचा आदर… 
शत्रूचे मर्दन… 
असेच असावे 
मावळ्यांचे वर्तन… 
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.. 
जय शिवराय
 
आशीर्वादासोबतच विचार घेऊया, 
लोककल्याणकारी राज्य घडवूया… 
शिवजयंतीच्या शुभेच्छा
 
श्वासात रोखुनी वादळ,
डोळ्यात रोखली आग..
देव आमचा छत्रपती,
एकटा मराठी वाघ…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत, 
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्व शिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा
 
भवानी मातेचा लेक तो,
स्वराज्याचा राजा होता..
झुकला नाही कोणासमोर,
मुघलांचा बाप होता…
छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
 
छ: छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र : त्रस्त मोगलांना करणारे,
प : परत न फिरणारे,
ति : तिन्ही जगात जाणणारे,
शि : शिस्तप्रिय,
वा : वाणिज तेज,
जी : जीजाऊचे पुत्र,
म : महाराष्ट्राची शान,
हा : हार न मानणारे,
रा : राज्याचे हितचिंतक,
ज : जनतेचा राजा
अशा या रयतेच्या राजास मानाचा मुजरा…
शिव जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा !
 
इतिहासाच्या पानावर,
रयते च्या मनावर,
मातिच्या कणावर आणी
विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे,
राजा शिवछत्रपती..
मानाचा मुजरा!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
 
सुर्य नारायण जर उगवले नसते तर,
आकाशाचा रंगच समजला नसता..
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर,
खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता…
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो…
शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
 
प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी…
शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
“जय शिवराय” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते…
शिवजयंती !
 
अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी, 
उधळण होईल भगव्या रक्ताची आणि 
फाडली जरी आमची छाती, 
तरी मूर्ती दिसेल शिवरायांची.. जय शिवराय!
 
 
एक विचार समतेचा… 
एक विचार नितीचा… 
ना धर्माचा.. ना जातीचा.. 
माझा राजा फक्त मातीचा… 
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!
 
यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, 
पुण्यवंत, नीतीवंत जाणता राजा.. 
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती