शरद पौर्णिमेच्या रात्री एक स्वस्तिक नशिबाचे दार उघडेल

शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (13:14 IST)
हिंदू धर्म ग्रंथात शरद पौर्णिमेला विशेष महत्त्व सांगितले आहे. शरद पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर सकाळी उठल्यावर उपास धरून आपल्या आराध्य देवाची पूजा करावी. इंद्र आणि महालक्ष्मीची पूजा करून तुपाचा दिवा लावून गंध फुलांनी पूजा करावी. ब्राह्मणाला दुधाचे किंवा खिरीचे जेवण द्यावे आणि त्यांना दान -दक्षिणा द्यावी. 
 
हा उपवास लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी केले जाते. असं म्हणतात की या दिवशी जागरण करणाऱ्याची संपत्ती वाढते.
* हे व्रत प्रामुख्यानं स्त्रिया करतात.
 
* या दिवशी चंद्रोदयाच्या दिशेने पाटावर स्वस्तिक बनवून त्यावर पाण्याने भरलेला तांब्या भरून ठेवावं.
 
* एका ग्लासात गहू भरून त्यावर नाणं ठेवावं आणि गव्हाचे 13 दाणे हातात घेऊन कहाणी ऐकावी.
 
* ग्लास आणि नाणं कहाणी सांगणाऱ्याला पाया पडून भेट द्यावं. 
 
* आपल्या आयुष्यात इतकी संपत्ती असणार की बऱ्याच पिढ्यांना कोणती ही कमी होणार नाही.
 
5 कामाच्या गोष्टी -
1 या दिवशी कोणत्याही प्रकाराचे तामसिक वस्तूंचे सेवन करू नये. या दिवशी मद्यपान आणि नशा करणे टाळावे. या मुळे आपल्या शरीरावरच नव्हे तर आपल्या भविष्यावर देखील दुष्परिणाम होऊ शकतात.
 
2 शास्त्रात म्हटले आहे की प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर आई लक्ष्मी येते. म्हणूनच, आपण सकाळी लवकर उठून स्नानादी उरकवून पिंपळाच्या झाडासमोर काही तरी गोड अर्पण करून पाणी घालावं.
 
3 यशस्वी वैवाहिक जीवनासाठी पौर्णिमेच्या दिवशी पती-पत्नी दोघांना चन्द्रमाला दुधाचे अर्घ्य द्यावे. या मुळे वैवाहिक जीवनात गोडपणा कायमचा राहतो.  
 
4 कोणत्याही विष्णू लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन अत्तर आणि सुवासिक उदबत्ती अर्पण करावी आणि धन, सौख्य, समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी आई लक्ष्मीला आपल्या घरात कायमस्वरूपी राहण्याची प्रार्थना करावी.
 
5 जर आपल्या कुंडलीत चंद्र दोष असेल तर हा दिवस आपल्यासाठी अती उत्तम ठरेल. शरद पौर्णिमेला चंद्राशी निगडित गोष्टी दान कराव्यात किंवा या दिवशी लोकांना दुधाचे वाटप करावे. या शिवाय 6 नारळ आपल्यावरून ओवाळून एखाद्या वाहत्या नदीत प्रवाहित करावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती