सचिनचा चांदीची बॅट देऊन सत्कार

भाषा

गुरूवार, 25 फेब्रुवारी 2010 (11:59 IST)
PR
PR
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी 20 वर्ष पूर्ण केली असून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्वीशतक झळकविणाला पहिला फलदांज म्हणून त्याने नवा इतिहास रचला आहे. मध्यप्रदेश क्रिकेट संघ व ग्वालियर डिव्हिजन क्रिकेट संघाच्या वतीने (जीडीसीए) सचिनाला चांदीची बॅट देऊन सन्मानीत करण्‍यात आले.

सचिनने कॅप्टन रूपसिंह स्टेडियमवर बुधवारी दक्षिण आफ्रीकेविरुध्द झालेल्या दुसर्‍या वन-डे सामन्यात द्वीशतक (नाबाद 200) आपल्या नावे केले.

जीडीसीएकडून याशिवाय सचिनला दहा लाख रुपये रोख पुरस्कार देऊन येथील स्टेडियमच्या एका तंबूला सचिनचे नाव देण्याचे जाहीर केले आहे.

वेबदुनिया वर वाचा