सचिन खेळताना ईश्वरही सामना पाहतात

विक्रमादित्य सचिन तेंडुलकरने ग्वाल्हेर एकदिवसीय सामन्यात द्विशतक केल्यानंतर एक मजेदार एसएमएस सर्वत्र फिरत आहे. या एसएमएसमधून सचिनच्या महानतेचा उल्लेखच क्रिकेटप्रेमी करीत आहे.

एसएमएसमध्ये म्हटले आहे की, सचिन जेव्हा फलंदाजी करीत असतो तेव्हा तुम्ही कोणतेही पाप करण्यास स्वतंत्र आहे. कारण त्यावेळी देवही सचिनची फलंदाजी पाहण्यात मग्न असतात. यामुळे देवाच्या नजरेतून तुमचे पाप मुक्त राहते.

क्रिकेटचा ईश्वर म्हटला जाणार्‍या सचिनबाबत हा एसएमएस सर्वत्र फिरत आहे. हा एसएमएस सचिनपर्यंत पोहचला तर त्याची प्रतिक्रिया काय राहील? नक्कीच तो विनम्रतेने हसून काहीसा लाजेल.

वेबदुनिया वर वाचा