राज्यसभेत सचिनला 'भारतरत्न' देण्याची मागणी

एकदिवसीय सामन्यात द्विशतकाचा विश्‍वविक्रम करणार्‍या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी राज्यसभेत करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ही मागणी केली.

खा. रणजितसिंह मोहिते म्हणाले, की गेल्या दोन दशकांनापासून सचिन सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे. त्याने क्रिकेटमधील अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. यामुळे देशातील युवकांचा तो आदर आहे. सरकारने त्याला 'भारतरत्न' पुरस्कार दिला पाहिजे.'

वेबदुनिया वर वाचा