Russia-Ukraine War: रशियाने पुन्हा युक्रेनच्या निवासी भागात बॉम्ब टाकला , पाच जणांचा वेदनादायक मृत्यू

शनिवार, 9 जुलै 2022 (21:54 IST)
पूर्व युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या खार्किव येथील निवासी भागांवर रशियाने पुन्हा एकदा बॉम्बफेक केली आहे. या बॉम्बस्फोटात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशांमध्‍ये युद्ध अजूनही सुरूच आहे आणि यामुळे आतापर्यंत सुमारे 15 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 10 हजारांहून अधिक जवान शहीद झाले आहेत.
 
27 जून रोजी रशियन क्षेपणास्त्रांनी युक्रेनच्या क्रेमेनचुक शहरात असलेला एक शॉपिंग मॉल उद्ध्वस्त केला होता, जेव्हा तेथे शेकडो लोक उपस्थित होते. या हल्ल्यात 18 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनसोबतच्या युद्धात पश्चिमेला थेट सामील होण्याचे आव्हान दिले आहे.
 
पुतीन म्हणाले, आम्ही शांततेच्या विरोधात नाही, पण जे विरोधात आहेत त्यांनी हे जाणून घेतले पाहिजे की पाश्चात्य देशांचा हस्तक्षेप जितका वाढेल तितकी शांतता अधिक कठीण होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती