रशिया : युक्रेनच्या लविवमध्ये भीषण स्फोटाचे आवाज - स्थानिक माध्यमं

रविवार, 13 मार्च 2022 (13:35 IST)
युक्रेनच्या पश्चिमेस असलेल्या लव्हिव शहरात भीषण स्फोटांचे आवाज ऐकायला आल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीच्या युक्रेनी सेवेला सांगितलं.
 
यूएनआयएन वृत्त सेवेनेही सोशल मीडियावरील युजर्सच्या माध्यमातून म्हटलंय की, लविव शहरात दोन मोठ्या स्फोटांचा आवाज ऐकायला मिळाला.
 
स्थानिक माध्यमांच्या वृत्तांनुसार, लविवसह युक्रेनमधील अनेक भागात रात्रभर हवाई हल्ल्यांच्या सायरनचा आवाज ऐकायला येत होता.
 
कीव्ह इंडिपेंडंटनुसार, "लविवमध्ये रशियन मिसाईलने हल्ले होत आहेत."
पश्चिम युक्रेनच्या लव्हिव शहरात सध्या परदेशी माध्यमांचे अनेक प्रतिनिधी आहेत. त्याचसोबत, युक्रेनमधून बाहेर जाणारे लोकही लव्हिव शहरामार्गेच पुढे जात आहेत.
 
प्रत्यक्षदर्शींनी बीबीसी युक्रेनी सेवेला सांगितलं की, पश्चिमेकडील इव्हानो-फ्रेंकिव्स्कमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत.
 
युक्रेनी मीडियाही लव्हिवमध्ये हल्ल्याचे वृत्त देत आहे.
 
लष्करी प्रशिक्षणाच्या मैदानावर हल्ला
बीबीसी युक्रेनी सेवेनुसार, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार लव्हिव शहरात असलेल्या युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रशियानं इथं हवाई हल्ले केले आहेत.
अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, रशियानं इथल्या इंटरनॅशनल पीसकीपिंग अँड सिक्युरिटी सेंटरवर आठ मिसाईलने हल्ले केले.
 
हे केंद्र लव्हिव शहरापासून जवळपास 30 किलोमीटर दूर यावोरिवमध्ये आहेत आणि इथं लष्कराचं प्रशिक्षण मैदान आहे.
 
इथल्या आभाळात धुराचे लोट दिसून येतात, इतकी काय हल्ल्यांची तीव्रता होती.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती