शनि शिंगणापूर असे एक गाव जीथे घरांना दरवाजेच नाही, हे आहे गावाचे रहस्य, शनी आरती,परिचय
घरातील सर्वांना जेव्हा बाहेर जायचे असते तेव्हा घराचा दरवाजा बंद करून कडी लावून कुलूप लावून बाहेर जातात. पण असे गाव आहे की जीथे घराला मुख्य दरवाजाच नाही आणि आणि दरवाजा नसतांना या गावात एक ही चोरी घटना होत नाही. तर चला मग जाणून घेवू असे कोणते गाव आहेत...
गावातील स्थानिक लोकांना असा विश्वास आहे गावातील शनिदेव त्यांचे संरक्षण करतो, आणि प्रत्येक संकटातून मुक्त करतो. म्हणून या गावातील दरवाजे नसतानाही घरात चोरीसारख्या घटना घडत नाहीत.
श्री शनैश्वर देवस्थान शनी शिंगणापूर ता. नेवासा या देवस्थानची ख्याती दूरदूर वर घरांना दरवाजे नसलेल्या आगळ्या वेगळ्या देवस्थानच्या रुपात जगात प्रसिद्ध आहे. अहमदनगर जिल्ह्याला श्री संतांची भूमी मानतात. उगीच काही लोक श्री शनिदेवाचे नाव काढताच घाबरतात. वास्तविक ही सर्व भीती खोटी आहे. श्री शनी देव आपला शत्रू नसून तो मित्र आहे. आपल्या दैनंदिन जीवनात तेजपुंज व शक्तीशाली शनीचे आगळे-वेगळे महत्व आहे.
आपले शरीर पंच तत्वांनी पंच महाभूतांनी बनलेले आहे. अन यांचा (पंच महाभूत) परिणाम आपल्या शरीरावर होत आसतो, हेच ग्रह आपल्यावर नियंत्रण करीत असतात. शनी सौर जगातील नऊ ग्रहांमधील सातवा ग्रह आहे, शनीची गुरुवाकर्षण शक्ती पृथ्वीपेक्षा अधिक असल्यामुळे आपल्या मनात जो काही विचार येतो, ज्याला कल्पना, योजना आखतो त्याची चांगली आथवा वाईट योजना चुंबकीय शक्तीने शानिपर्यंतपोहचते. फलस्वरूप चागल्यांचा परिणाम चांगला वाईटचा परिणाम वाईट तत्काळ दिसून येतो.
महाराष्ट्रात, भारतात तर सर्वच शनी शिंगणापूरच्या महिमेशी परिचित आहेत, परंतु श्री शानिदेवांची कीर्ती साता समुद्रा पलीकडे जाऊन पोहोचली आहे. अशा या जागतिक ख्याती पावलेल्या देवस्थानाकडे श्री शनी देवाच्या दर्शनानंतर ह्याच श्री शनी देवावर सामाजिक धार्मिक शास्त्रीयसांस्कृतिक भोगोलिक कौटुंबिक अनुभवाच्या ज्ञानावर आधारलेली माहिती सर्व भक्तांसाठी उपलब्ध करीत आहोत.
इतिहास – शनी शिंगणापूर(shani shingnapur):-
अचूक कालावधी कोणाला माहिती नसला तरी असे मानले जाते की स्वयंभू शनैश्वरा पुतळा प्राचीन काळापासून तत्कालीन स्थानिक वस्तीतील मेंढपाळांना सापडला होता. हे कमीतकमी कलुयुगापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते.
स्वयंभू पुतळ्याची कथा पिढ्या न पिढ्या तोंडाच्या शब्दाने दिली गेलेली गोष्ट अशी आहे: मेंढीपाळाने दगडाला टोकदार दांडी लावली तेव्हा दगडाला रक्तस्राव होऊ लागला. मेंढपाळ चकित झाले. लवकरच चमत्कार पाहण्यासाठी संपूर्ण गाव आजूबाजूला जमले. त्या रात्री मेंढपाळांच्या परमनिष्ठ व पुण्यवानांच्या स्वप्नात भगवान शनैश्वर दिसले.
त्याने मेंढपाळांना सांगितले की तो “शनैश्वर” आहे. त्यांनी असेही सांगितले की, काळ्या रंगाचा अनोखा तो दगड म्हणजे स्वयंभू रूप आहे. मेंढपाळाने प्रार्थना केली व स्वामीला विचारले की, त्याच्यासाठी मंदिर बांधावे काय? भगवान शनी महात्मा म्हणाले की, छताची गरज नाही कारण संपूर्ण आकाश हे त्याचे छप्पर आहे आणि त्यांनी मुक्त आकाशाखाली राहणे पसंत केले. त्यांनी मेंढपाळांला दर शनिवारी पूजा आणि तैलाभिषेकन चुकता करण्यास सांगितले. संपूर्ण गावात डकैत, घरफोडी किंवा चोरांची भीती नाही, असेही त्याने वचन दिले.
म्हणून, आजही भगवान शनिदेव हे वरच्या छताशिवाय खुल्या आवारात दिसून येतात . आजपर्यंत कोणतीही घरे, दुकाने, मंदिरांसाठी दरवाजे नाहीत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की पोस्ट ऑफिसलाही दरवाजा नसल्यामुळे कुलूप नसते. भगवान शनींच्या भीतीमुळे या शनी मंदिराच्या एक किलोमीटरच्या परिसरात वसलेली घरे, झोपड्या, दुकाने इत्यादींना दरवाजे किंवा कुलुप नाहीत.
२०१० पर्यंत चोरी किंवा घरफोडीची नोंद झालेली नाही. २०११ मध्ये पुन्हा चोरीची नोंद झाली. चोरी करण्याचा प्रयत्न केलेल्या काही जणांच्या कृत्याच्या काही मिनिटांतच आणि उलटून जाण्यापूर्वी रक्ताच्या उलटय़ा करून मरण पावले. असे म्हणतात की बर्याच जणांना दीर्घ आजारपण, मानसिक असंतुलन इत्यादी वेगवेगळ्या शिक्षा त्यांना प्राप्त झाल्या आहेत.
दर्शनाचे नियम – शनी शिंगणापूर(shani shingnapur temple)
येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत. देव दर्शन दिवसातून कोणत्याही वेळेस घेता येते. शनी बाल ब्रह्मचारी असल्याने महिला दूरूनच दर्शन करतात. स्त्रियांना मात्र चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास मनाई आहे. दर्शनापूर्वी आंघोळ करून शुचिर्भूत होणे आवश्यक असते. आंघोळीची व्यवस्था देवस्थानाच्या आवारात कायम आहे. पुरूष स्नान करून, ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात. त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तीळाचे तेल वाहून प्रदक्षिणा घालतात. दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असलेल्या दुकानातून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यांनी बनलेली शनी देवाची बाहुली खरेदी करतात. घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्याने दृष्ट लागत नाही, असे मानले जाते. शिवाय घरात सुख-समृद्धी नांदते.
शनि अमावस्या :-
हा दिवस शनिदेवची उपासना करण्यासाठी सर्वात शुभ अवसर मानला जातो. या दिवशी लोकं परमेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. या दिवशी शनिची जत्रा आणि मिरवणूक काढली जाते. प्रत्येक शनिवारी शनिदेवाची पूजा करणे अत्यंत अनुकूल मानले जाते.
शनि जयंती :-
ज्या दिवशी भगवान शनि जन्मला होता किंवा पृथ्वीवर प्रकट झाला होता, याला शनिश्चरा जयंती म्हणून देखील ओळखले जाते आणि वैशाख महिन्यात अमावस्येच्या दिवशी पाळले जाते. या दिवशी मूर्ती निळ्या रंगाची दिसते. पंचमृत आणि गंगाजल शनिश्चराच्या मूर्तीच्या स्वच्छतेसाठी वापरले जातात.
मंदिरात विशेष विधी :-
भाविक चतुर्थांश नारळ, वाळलेल्या खजूर, सुके खोबरे, सुपारी, तांदूळ, हळद, कुमकुम, गुलाल, साखर, फुले प्राधान्यतः निळा, काळा कपडा, दही आणि अभिषेकसाठी दूध देतात.
मंदिरातील पूजेचा दैनिक वेळापत्रक :-
शिंगणापूर येथील शनि मंदिर सकाळी ५ ते रात्री १० या वेळेत पूजेसाठी खुले आहे.
शनी शिंगणापूर मंदिरास कसे पोहोचले जाते ?
शनि शिंगणापूर हे अहमदनगर शहरापासून सुमारे ३५ किलोमीटर, पुण्याच्या ईशान्य दिशेला १६० किलोमीटर आणि औरंगाबादपासून ८४ किलोमीटर अंतरावर आहे.
हवाईमार्गे :-
औरंगाबाद येथे सर्वात जवळचे विमानतळ शनी शिंगणापूरपासून ९० किमी अंतरावर आहे.
रेल्वे मार्गे :-
शनि शिंगणापूर मंदिरात जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक म्हणजे अहमदनगर, राहुरी, श्रीरामपूर आणि बेलापूर.
शनिदेवाची आरती
|| श्री ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
सुर्यसुता शनिमूर्ती | तुझी अगाध कीर्ति
एकमुखे काय वर्णू | शेषा न चले स्फुर्ती || जय || १ ||
नवग्रहांमाजी श्रेष्ठ | पराक्रम थोर तुझा
ज्यावरी कृपा करिसी | होय रंकाचा राजा || जय || २ ||
विक्रमासारिखा हो | शककरता पुण्यराशी
गर्व धरिता शिक्षा केली | बहु छळीयेले त्यासी || जय || ३ ||
शंकराच्या वरदाने | गर्व रावणाने केला
साडेसाती येता त्यासी | समूळ नाशासी नेला || जय || ४ ||
प्रत्यक्ष गुरुनाथ | चमत्कार दावियेला
नेऊनि शुळापाशी | पुन्हा सन्मान केला || जय || ५ ||
ऐसे गुण किती गाऊ | धणी न पुरे गातां
कृपा करि दिनांवरी | महाराजा समर्था || जय || ६ ||
दोन्ही कर जोडनियां | रुक्मालीन सदा पायी
प्रसाद हाची मागे | उदय काळ सौख्यदावी || जय || ७ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळीतो | मनोभावे करुनी सेवा ||
श्री शनिदेवाचे शनि शिंगणापूर मध्ये आगमन
श्री शनिदेवाच्या विशाल अनुकंपा मुळे जर आपण शनि शिंगणापूर मध्ये दर्शनास आलात अन् जि मूर्ती बघाल ती साधारण नसून जागृत स्वयंभू मूर्ती आहे. १६” ६” लांब व १६” ६” रुंद चौथऱ्यावर हे शनि महाराज कसे अवतीर्ण झालेत याची सुद्धा एक खरी कहाणी सांगतात.
आजपासून जवळ जवळ ३५० वर्षापूर्वी श्री शनिदेव हया गावात आले. त्यावेळी इथे छोटीशी वस्ती होती, २०-३० झोपड्या तेव्हा गावात असतील. आजच्या इतकी लोकसंख्या तेव्हा नव्हती , ना आजच्या सारख्या सुख सुविधा , रस्ते व वहाने. पूर्वी हया भागातफार गवत, झाडी , चिखल असायचा, जवळ पास विस्तीर्ण शेती होती. आज सरकार , गावकरी व श्री शनिदेवाच्या नावाने असलेल्या ट्रस्टच्या सहकार्याने खूप प्रगती दिसते.