बीडमध्ये सासऱ्याच्या प्रेम विवाहाची सुनेला शिक्षा, पंचायतीचा धक्कादायक निकाल

शनिवार, 28 सप्टेंबर 2024 (15:10 IST)
बीड जिल्ह्यात आष्टी डोईठाण गावात एका व्यक्तीने समाजाची परवानगी न घेता प्रेम विवाह केले. त्याला पंचायतीने अडीच लाखांचा दंड ठोठावला. त्याने दंड न भरल्यामुळे त्याची शिक्षा सुनेला देण्यात आली.पंचायतने दिलेल्या निकालानुसार, सुनेच्या सात पिढ्यांवर बहिष्कार टाकण्यात आला.

सदर घटना 22 सप्टेंबरची आहे. समाजाच्या परवानगीशिवाय सासरच्यांनी प्रेमविवाह केला.सासरच्यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला होता. त्यामुळे त्याला अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, तो न भरल्याने त्याने आपल्या सुनेसह आपल्या मुलाला जात पंचायतीत बोलावले. दोघांनीही पैसे देण्यास असमर्थता दर्शवल्यावर पंचांनी या कुटुंबाला सात पिढ्यांसाठी समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला. 

पीडित महिलेच्या सासऱ्यांनी समाजची परवानगी न घेता प्रेम विवाह केला. समाजात ही बाब समजल्यावर जात पंचायत बसवण्यात आली. महिलेच्या सासऱ्याला अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. अनेक वर्ष उलटून देखील त्यानी दंड भरला नाही.

या साठी 21 सप्टेंबर 2024 रोजी त्यांना जात पंचायतीत बोलवण्यात आले. पीडित महिला आपल्या पती आणि दोन मुलांसह पंचायतीत पोहोचली. त्या दिवशी निर्णय झाला नाही. मात्र 22 सप्टेंबर रोजी पुन्हा त्यांना जात पंचायतीत बोलावले आणि त्यांच्या सात पिढ्यांचा बहिष्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिसांना सांगितले तर ठार मारू अशी धमकी दिली. महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 
Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती