Anniversary Wishes For Parents in Marathi आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
बुधवार, 23 एप्रिल 2025 (11:30 IST)
केवळ इतके वर्ष नातं नाही जपलं तर
आम्हाला चांगले संस्कार देऊन मोठं केलं
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
आणि आमच्यावर असेच आशीर्वाद असो
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई-बाबा
प्रत्येक समस्येवर उत्तर तुम्ही आहात
प्रत्येक ऋतूतील बहर तुम्ही आहात
आम्हा मुलांच्या जीवनाचं सार तुम्ही आहात
पृथ्वीवर देवाची ओळख तुम्ही आहात
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई-बाबा
जगातील सर्वात उत्कृष्ट पती पत्नी आणि
माझ्या आई वडिलांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
तुमच्या प्रेमाचा वर्षाव करुन
खर्या सुखांची ओळख तुम्ही करुन दिली
हॅपी एनिव्हर्सरी आई-बाबा
आम्ही तुम्हाला नेहमीच एकत्र पाहिलं आहे
तुमचं एकमेकांवरील प्रेम, विश्वास पाहिला आहे
आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो
तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो
लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा
दिव्याप्रमाणे आपल्या आयुष्यातील कायम प्रकाश राहो
माझी प्रार्थना आपली जोडी असीच कायम राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई-बाबा
समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम
दोघांच्या प्रेमाची गाडी अशीच राहो चालत
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई-बाबा
दरवर्षी असाच करा साजरा प्रेमाचा हा उत्सव
जन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन
लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा
माझ्यासाठी देवा पेक्षाही जास्त ज्यांना मान आहे
अशा माझ्या लाडक्या आई-बाबांना
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा