Anniversary Wishes For Wife In Marathi पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मंगळवार, 21 मे 2024 (16:36 IST)
वर्षे गेली उलटून
पण मी नाही बघितलं कुणालाही पलटून
कारण आजही माझ्या आयुष्यातील
सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
जिच्यामुळे माझ्या आयुष्याला सुंदर बनलं
तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
 
आकाशाचा चंद्र तुझ्या हातात येवो,
तू जे मागशील ते तुला मिळो,
तुझं प्रत्येक स्वप्नं पूर्ण होवो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
आयुष्यातील कडक उन्हात
तू बनते माझी सावली
अशीच राहो आपली साथ
आजचा दिवस आहे खास
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
आजच्या या खास दिवशी
आपण सगळ्या आठवणींना पुन्हा ताजं करूया
एकत्र फिरलेल्या ठिकाणी पुन्हा
सुंदर क्षण घालवयू या
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
आपल्यात कितीही वाद झाले तरी
अबोला धुरु नको
मतभेद झेपतील मला
मनभेद होऊ देऊ नको
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
जन्मोजन्मी राहावं तुझं-माझं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत
हीच प्रार्थना आहे देवाकडे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो आपली जोडी कायम
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर
नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण
कारण आनंदच घेऊन येईल येणारा प्रत्येक क्षण
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
आपल्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थना करतो की,
आपल्या दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम, आनंद
आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
आज तो खास दिवस पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 
प्रेम म्हणजे फक्त गिफ्ट, कॅंडललाइट डिनर आणि गुलाबाची फुले नाहीत
प्रेम म्हणजे रोज एकमेकांसोबत जगणं 
एकमेकांशी बोलणं 
एकमेकांना वेळ देणं
खुल्या मनाने एकमेकांना स्वीकारणं
जे आपण दोघांनी निभावले
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती