दूध पाजल्यानंतर या सोप्या पद्धतींनी बाळाची ढेकर काढावी

How to Burp a Baby पहिल्यांदा आई झाल्यानंतर आयुष्यात अनेक बदल होतात. आईला तिच्या बाळाबद्दल अनेक नवीन गोष्टी शिकायच्या असतात. यामध्ये आहार देणे आणि त्यानंतर बाळाने ढेकर देणे हे सर्वात आव्हानात्मक असते. आईने प्रत्येक वेळी आहार दिल्यानंतर बाळाची ढेकर काढावी आणि असे करणे महत्त्वाचे असते असे सांगितले जाते. जेव्हा एखादे मूल दूध पितं तेव्हा ढेकर दिल्याने त्याच्या पोटात गॅस तयार होण्यापासून रोखते.
 
अशात बाळाने ढेकर देणे फार महत्वाचे आहे. एखादे मूल दूध प्यायल्यावर ढेकर न देताच झोपाले तर ते उठल्याबरोबर त्याचे दूध बाहेर येते आणि नंतर मुलाला चिडचिड होऊ शकते. अशा परिस्थितीत बाळाला झोपण्यापूर्वी ढेकर देणे खूप महत्वाचे आहे. अशात तुम्ही या सोप्या पद्धतींद्वारे मुलांना ढेकर देण्यात मदत करु शकता.
 
जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला रात्री दूध पाजता तेव्हा त्याच्या पाठीवर हलक्या हाताने थाप द्या आणि जर ही युक्ती काम करत नसेल, तर त्याला हळू हळू उचलून घ्या किंवा त्याच्या तळाला थोपटत राहा. तथापि हे करताना आपण खूप वेग वाढवू नका हे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. अन्यथा मूल उलटी करु शकतं. तसेच स्तनपानाऐवजी बाटलीनं दूध पिणाऱ्या बाळांकडून अधिक ढेकर काढून घेणे आवश्यक असते. कारण स्तनपानादरम्यान त्यांच्या पोटात हवा जाण्याचं प्रमाण बाटलीनं दूध पिण्याच्या तुलनेनं कमी असते.
 
जेव्हा बाळाला ढेकर देण्याची गरज असते, तेव्हा त्याला खांद्यावर घ्या. बाळाची हनुवटी खांद्यावर असावी. एका हाताने बाळाच्या डोक्याला आधार देत दुसर्‍या हाताने त्याच्या पाठीवरुन हात फिरवा.
 
याशिवाय तुम्ही बाळाला तुमच्या मांडीवर बसवून ढेकर काढू शकता. मुलाला बसवताना त्याला आपल्या हातांनी आधार द्या.
 
जर बाळाला आहार दिल्यानंतर ढेकर येत नसेल तर त्याला जास्त काळ एकाच स्थितीत ठेवू नका. काहीवेळा असे होऊ शकते की तुमचे बाळ एका स्थितीत ढेकर घेत नसेल, तर तुम्ही ते बदलू शकता आणि दुसरी पद्धत अवलंबू शकता.
 
स्ट्रेचिंग ही बाळाची ढेकर काढण्याची अतिशय सोपी प्रक्रिया आहे. त्याला आडवे करून तुम्ही त्याचे शरीर ताणू शकता. यासाठी एका हाताने मुलाची उजवी कोपर आणि दुसर्‍या हाताने डावा गुडघा पकडून त्यांना हळू हळू ओलांडून त्याचे शरीर ताणावे. यामुळे आत अडकलेली गॅस बाहेर पडण्यास मदत होईल आणि मुल ढेकर घेण्यास सक्षम होईल.
 
Disclaimer: लेखात नमूद केलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नयेत. आपल्याला काही प्रश्न किंवा चिंता असल्यास नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती