झोमॅटो, फूडपांडानंतर मनसेचा 'स्विग्गी'ला दणका

गुरूवार, 4 ऑक्टोबर 2018 (14:35 IST)
झोमॅटो, फूडपांडा अशा ऑनलाइन कंपनी व्यवस्थापनाला दणका दिल्यानंतर महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेने आपला मोर्चा स्विग्गीकडे वळवला आहे. स्विग्गी कंपनीवर धडक देत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने जोरदार गोंधळ घातला. वितरकांना 'भागीदार' म्हणून संबोधण्यापेक्षा 'कामगार' म्हणून कामगारांना ज्या सुविधा मिळतात त्याच ह्या वितरकांना द्याव्यात अशी मागणी मनसेकडून केली जात आहे.
 
याआधी खाद्यपदार्थ पुरवठ्याची ऑनलाइन सेवा देणार्‍या 'झोमॅटो' कंपनीच्या कामगारांनी मनसे कामगार सेनेकडे मदत मागितली होती. मनसे कामगार सेनेच्या पदाधिकार्‍यांनी व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मागण्या मान्य केल्या होत्या.
 
मनसे कामगार सेनेकडून झोमॅटोवर मोर्चा काढत व्यवस्थापनासोबत चर्चा करण्यात आली होती. किमान कामगार सुविधा न देणे, बळजबरीने राजीनामे घेणे अशा चुकीच्या कामगार प्रथा लवकरात लवकर थांबवा असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले होते. कामगरांचे प्रश्र्न सोडवायला दिल्लीकरांची परवानगी लागत असेल तर झोमॅटोला महाराष्ट्रात एकही डिलीव्हरी करू देणार नाही असा सज्जड यावेळी मनसेकडून देण्यात आला होता. चर्चेनंतर व्यवस्थापनाने कामगारांच्या प्राथमिक मागण्या मान्य केल्या होत्या. यापुढे कामगारांशी चर्चा करुनच पुढील निर्णय घेण्याचे आश्र्वासनही यावेळी झोमॅटोकडून देण्यात आले होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती