तरुणाने ताम्हिणी घाटात धबधब्यात उडी मारली, वाहून गेला Video

सोमवार, 1 जुलै 2024 (15:54 IST)
पिंपरी चिंचवड येथील एका तरुणाने ताम्हिणी घाटात मोठ्या उंचीवरून धबधब्यात उडी मारली. यानंतर त्याने बाहेर येण्याचा प्रयत्न केला मात्र जोरदार प्रवाहात तो वाहून गेला. स्वप्नील धावडे असे मृत तरुणाचे नाव आहे. 
 
स्वप्नील जिमच्या इतर 32 मित्रांसह धबधब्यावर गेला होता. ही संपूर्ण घटना त्याच्या मित्रांनी बनवलेल्या व्हिडिओमध्ये कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पावसाळ्यात पिकनिकसाठी तरुणांचा ग्रुप ताम्हिणी घाटावर गेला होता. तेथे धबधब्यात उडी मारल्यानंतर त्याने अनेकदा दगड धरण्याचा प्रयत्न केला मात्र जोरदार प्रवाहात वाहून गेला. स्वप्नील हा पिंपरी-चिंचवडच्या भोसरी येथील रहिवासी आहे. 
 

PUNE | पिंपरी चिंचवड येथील स्वप्नील धावडे हा तरुण ताम्हिणी घाटातील धबधब्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याने पावसाळ्यात निघालेले दु:खद बदल घडले. आपल्या व्यायाम शाळेतून इतर 32 जणांच्या गटासह गेलेला धावडे पाण्यात उडी मारून बेपत्ता झाला. हा ग्रुप शनिवारी वीकेंडला सहलीसाठी मुळशी… pic.twitter.com/PPt3IhLHJH

— ℝ???????? ???????????????? (@Rajmajiofficial) July 1, 2024
मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील धावंडे नावाचा तरुण त्याच्या जिममधून 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटावर मौजमस्ती करण्यासाठी गेला होता. शनिवारी हा ग्रुप ताम्हिणी घाटात असलेल्या प्लस व्हॅलीमध्ये गेला. ताम्हिणी घाटात स्वप्नील धावंडेने पाण्यात उडी घेतली नंतर जोरदार प्रवाहात बेपत्ता झाला आहे. 
 
व्हायरल व्हिडिओमध्ये तो उंचावरून उडी मारताना दिसत आहे. स्थानिक प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या भागात शोधमोहीम राबवली. त्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे तरुणाचा मृतदेह सापडल्याची बातमी आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती