दोन महिलांनी 75 हजाराच्या तीन महाराणी पैठणी चोरल्या

गुरूवार, 17 मार्च 2022 (22:07 IST)
पैठणीचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या येवल्यातच पैठणींची चोरी झाली आहे. दोन महिलांनी खरेदीचा बहाणा करत महाराणी पैठणी साड्यांची चोरी केली असल्याचं उघड झाल आहे. यात  75 हजार रुपये किंमतीच्या तीन महाराणी पैठणी  चोरल्या आहेत. नाशिक-औरंगाबाद  राज्य मार्गावरील येवला तालुक्यात जळगाव नेऊर इथं चोरीची ही घटना घडली. चोरीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. याप्रकरणी आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली  असून पोलिसांनी आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं भामट्या महिलांचा शोध घेत आहे.
 
सदरची घटना  17 मार्च रोजी दुकानातील साड्यांची पाहणी करत असते वेळी महाराणी साड्या गहाळ झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर या साड्याचा शोध घेतला असता चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पैठणी साडीतल्या महाराणी साड्यांची चोरी झाल्याचं उघड झालं. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर 12 मार्च रोजी चोरीची ही घटना असल्आयाच समजल. यात 12 मार्च रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोन महिला पैठणी खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी घरात लग्न असल्याने महागड्या आणि दर्जेदार पैठणी दाखवण्याची मागणी केली. यावेळी 25 हजार रुपये किमतीची महाराणी पैठणी दाखवण्यात आली. या पैठणी दाखवल्यानंतर यातील आणखीन व्हरायटी दाखवण्याची मागणी  त्यांनी केली. या दरम्यान ग्राहक बनून आलेल्या दोन्ही महिलांनी दुकानदार व कामगारांची नजर चुकवून पंचवीस हजार रुपये किमतीच्या तीन महाराणी पैठणी चोरून नेल्या.
 
याबाबत येवला तालुका पोलिस ठाण्यात लावल्या पैठणीचे मालक आकाश ठोंबरे यांनी तक्रार दाखल केली असून येवला तालुका पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे या दोन भामट्या महिलांचा शोध घेत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती