पैलवान शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड़वर 3 वर्षांसाठी बंदी

सोमवार, 3 फेब्रुवारी 2025 (15:06 IST)
महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती सामन्यात पैलवान शिवराज राक्षे आणि पैलवान महेंद्र गायकवाड़ यांनी पंचाशी वाद केल्यामुळे दोघांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले असून त्यांच्या कुस्ती खेळण्यावर 3 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. आता हे दोघे पुढच्या तीन वर्षांसाठी कोणत्याही कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकणार नाही. अशी माहिती राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी दिली आहे. 
ALSO READ: कुस्तीगीर पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी बनले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गदा सुपूर्द केली
वृतानुसार, महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या उपांत्य सामन्यात पैलवान शिवराज राक्षे यांनी पंचाशी वाद घालत लाथ मारत शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. तर कुस्तीच्या अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड़ यांनी पंचांच्या निर्णयाच्या विरोधात नाराजी व्यक्त करत पंचांना शिवीगाळ करत मैदान सोडले.या सर्व प्रकरणावर तात्काळ राज्य कुस्तीगीर परिषदेने बैठक घेत दोघांवर तीन वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 
ALSO READ: मंत्रालयात प्रवेशासाठी एफआरएस प्रणाली लागू, सुरक्षा आणि पारदर्शकतेसाठी सरकारने घेतला निर्णय
या प्रकरणावर राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम म्हणाले, सामन्यात पंचांच्या निर्णयाच्या विरोधात पैलवानांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी पंचांना लाथ मारणे, शिवीगाळ करणे असे चुकीचे कृत्य केल्यामुळे पैलवान शिवराज राक्षे यांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे.
ALSO READ: नागपूरमधील खासदार क्रीडा महोत्सवात मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
तसेच पैलवान महेंद्र गायकवाड़ यांनी देखील पंचांच्या निर्णयाचा विरोध करत त्यांना शिवीगाळ केली त्यामुळे त्यांच्यावर देखील तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही पैलवानांनी खिलाडूवृत्तीने खेळायला हवं होतं मात्र असे झाले नाही. शिवीगाळ करणे ेका खेळाडूला शोभा देत नाही. त्यामुळे दोघांना आता 3 वर्षांपर्यंत कोणत्याही कुस्तीच्या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. असा निर्णय घेण्यात आला आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती