तक्रारदार हे शेतकरी असून, त्यांच्या शेताजवळील सार्वजनिक डीपी जळाल्याने शेतातील डाळिंब बागेचे पाण्याशिवाय नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांनी वायरमन पप्पू खैरनार यांची भेट घेतली. त्याने शेतीसाठी सार्वजनिक इलेक्ट्रिक नवीन डीपी बसून देण्याचे मोबदल्यात 30 हजार रुपये व केबल लावण्याचे मोबदल्यात 2 हजार रुपये अशी एकूण 32 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तडजोडीअंती 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साधना इंगळ व त्यांच्या पथकाने केली.
Edited by : Ratnadeep Ranshoor