Solapur :लाच घेताना अभियंत्याला CBI ने अटक केली

बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (23:03 IST)
एक लाखाची लाच घेताना सीबीआयने सोलापूरच्या युटिलिटी पॉवरटेक लिमिटेडच्या अभियंत्याला अटक केली असून त्याला न्यायालयाने  14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. कंत्राटदाराने जमा केलेली सुरक्षा ठेव परत मिळवण्यासाठी या अभियंत्याने लाच घेतल्यामुळे CBI ने युटिलिटी पॉवर टेक लिमिटेड आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन्टरप्राइझेझ अशा या दोन्ही खाजगी कंपन्या आणि जाईंट व्हेंचर कंपनीच्या अभियंत्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्या विरुद्ध कंत्राटदाराने तक्रार नोंदवली आहे. कंत्राटदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, जमा केलेली सुरक्षा ठेव परत मिळवण्यासाठी आरोपी अभियंत्याने कंत्राटदाराकडून अडीच लाख रुपयांची मागणी केली नंतर बऱ्याच विनवण्याकरून अभियंत्याने 2 लाख रुपयांसाठी होकार दिला.हे पैसे दोन हफ्त्यात देण्याचे ठरले.नंतर या बाबतची तक्रार कंत्राटदाराने सीबीआय कडे केली.
 
सीबीआय ने सापळा रचून या अभियंत्याला  एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. नंतर त्याच्या घराचीही झडती घेण्यात आली असून त्यात गुन्ह्याची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून आरोपी अभियंत्याला अटक करण्यात आली. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती