काल शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली महत्वाची कॅबिनेट बैठक झाली त्यात मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवनियुक्त मंत्री उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे अतिवृष्टीग्रस्तांना सरकारने मोठा दिलासा दिला असून आता दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत देण्यात येणार आहे.आता शेतकऱ्यांना 13,600 रुपयांची मदत मिळणार आहे.ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसंच या बैठकीत मुंबई मेट्रो मार्गिका -3 च्या सुधारित प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. ही मार्गिका सुरु झाल्यानंतर नरिमन पाँईट, वरळी, वांद्रे कुर्ला संकुल व आंतरराष्ट्रीय व आंतरराज्य विमानतळ, मरोळ औद्योगिक वसाहत, सीप्झ अशी महत्वाची केंद्र मेट्रोमार्गावर जोडल्या जातील. कुलाबा ते आंतरराष्ट्रीय विमानतळ 50 मिनिटात पार करणे सहज शक्य होणार आहे. सध्या बोगद्यांचे 98.6 टक्के काम झाले असून भूमिगत स्थानकांचे सुमारे 82.6 टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी 73.14 हेक्टर शासकीय जमिन व 2.56 हेक्टर खासगी जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे.