नगर जिल्ह्याच्या नूतन पालकमंत्री निवडीसाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार हालचाली सुरू झाल्या असून यात उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव प्रथम क्रमांकावर आले आहे दरम्यान, आज बुधवारी नूतन पालकमंत्र्यांची घोषणा झाली,
गेल्या अनेक दिवसांपासून नगरला नवीन पालकमंत्री दिला जाणार, अशी चर्चा सुरू होती.
यामध्ये नगरचा अनुभव असलेले मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव आघाडीवर होते. त्यापाठोपाठ नगरमधून मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, निलेश लंके आदी नावांचीही चर्चा होती.