आता हे सर्व टोलनाके काढले गेले तर नक्कीच रस्ता तयार करणारी कंपनी याची भरपाई मागेल, परंतु सरकारने येत्या एका वर्षात देशातील सर्व टोलनाके हटवण्याची योजना तयार केली आहे. जीपीएस ट्रॅकिंगची यंत्रणेच्या चाचणीचे काम सुरू आहे. पुढील तीन महिन्यात यावर धोरण निश्चित करण्यात येणार आहे, असेही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी म्हणाले की, याआधीच्या काँग्रेस सरकारने अनेक ठिकाणी अन्याय पद्धतीने टोलनाके बसविले ज्यामुळे चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे. आम्ही येत्या तीन महिन्यात सर्व टोलनाके बंद करणार असून टोलवसुलीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. त्यांनी म्हटले की आम्ही प्रत्येक गाडीमध्ये जीपीएस ट्रॅकर प्रणाली बसविणार आहे. ज्यामुळे जेवढा प्रवास केला जाईल तेवढाच टोल आकारण्यात येईल.
हा टोल तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून वजा केला जाणार आहे.
टोलसाठी जीपीएस प्रणालीचे काम सुरु असून लवकरच ही जीपीएस सिस्टिम बाजारात येणार आहे.
रशियन सरकारच्या मदतीने जीपीएस सिस्टिम वर काम सुरू आहे.
योजना अमलात आल्यानंतर दोन वर्षात भारत पूर्णपणे टोलमुक्त होईल.
देशातील सर्व वाहने ट्रॅकिंग सिस्टमने सुसज्ज असतील.
सर्व जुन्या वाहनांमध्ये जीपीएस सिस्टिम तंत्रज्ञान बसवण्यासाठी सरकार वेगाने काम करेल.