तीन वर्षांत भारतात अमेरिकेच्या दर्जाचे रस्ते पाहायला मिळतील - नितीन गडकरी

सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (08:38 IST)
तीन वर्षांत भारतात अमेरिकेच्या दर्जाचे रस्ते पाहयला मिळतील, असं वक्तव्य रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.
 
सध्या भारतात दर दिवशी 38 किमी लांबीचे रस्तेबांधणीचे काम होत आहे. यापूर्वी दिवसाला केवळ 2 किमी रस्तेबांधणी होत होती असा दावाही गडकरींनी केला.ते अहमदाबाद येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

देशातील रस्तेनिर्मितीच्या कामासाठी 15 लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली.मेट्रो,रेल्वे, विमानतळ यांसारख्या पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक करण्याची संधी आहे असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं.
 
त्यांनी इंधनांच्या वाढत्या किमतींमुळे इलेक्ट्रीक कारचे उत्पादन वाढवा अशी सूचना नुकतीच उत्पादकांना केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती