नितीन गडकरींची इंधनाचा खर्च 20 टक्क्यांनी कमी करणाऱ्या गाड्यांचं उत्पादन करण्याची सूचना

गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (15:05 IST)
देशात इंधनाचा खर्च 30 ते 40 टक्क्यांनी वाढला आहे. यावर तोडगा म्हणून केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी कंपन्यांना इंधनाचा खर्च 20 टक्क्यांनी कमी करणाऱ्या गाड्यांचे उत्पादन करण्यास सांगितलं आहे. 
 
नितीन गडकरी यांनी मंगळवारी (3 ऑगस्ट) सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी फ्लेक्स फ्युअलवर चालणाऱ्या गाड्या कशा तयार करता येतील याकडे लक्ष द्या असे निर्देश दिले आहेत.
 
फ्लेक्स फ्युअल गाड्यांमधील इंजिन एकापेक्षा अधिक इंधनावर गाडी चालवू शकतं. ही गाडी पेट्रोल आणि इथेनॉल दोन्ही इंधनांवर चालू शकते. त्यामुळे या गाड्या लवकरात लवकर बाजारात येतील यादृष्टीने कामाला लागा अशी सूचना त्यांनी केली आहे.
 
देशात इथेनॉलची किंमत 60-70 रुपये आहे. मागणीनुसार उत्पादन वाढले तर किंमती आणखी कमी होऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांचा इंधनांवरील खर्च कमी होईल असंही नितीन गडकरी म्हणाले होते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती