साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार : ना. विखे

मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (21:17 IST)
शिर्डी श्री साईबाबा संस्‍थानमधील ५९८ कंत्राटी कर्मचा-यांच्‍या प्रश्‍नांबाबत मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याशी आपली प्राथमिक चर्चा झाली असून, हे प्रश्‍न आपण कायमस्‍वरुपी मार्गी लावण्‍यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक आयोजित करुन निर्णय करण्याची ग्‍वाही महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबासंस्थानच्याकर्मचा-यांच्‍या शिष्‍टमंडळास दिली
 
आपल्‍या प्रलंबित मागण्‍यांसाठी कर्मचा-यांच्‍या शिष्‍टमंडळाने लोणी येथे महसूलमंत्र्यांची भेट घेवून निवेदन सादर केले. यापूर्वी कर्मचारी संघटनेने आपल्‍या मागण्‍यांकरिता आंदोलनाचा इशाराही दिला होता. परंतू प्रश्‍न मार्गी लावण्‍याबाबत शिर्डी दौ-यात आश्‍वासीत केल्‍यानंतर संघटनेने आपले आंदोलन स्‍थगित केले होते.महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांच्‍या समवेत संघटनेच्‍या शिष्‍टमंडळाची लोणी येथे पुन्‍हा सविस्‍तर चर्चा झाली. कंत्राटी कर्मचा-यांच्‍या संदर्भात माझी नेहमीच सकारात्‍मक भूमिका राहिली.
 
यापूर्वीही आपण व्‍यक्तिगत लक्ष घालून यापुर्वी देखील अनेक प्रश्‍न मार्गी लावले होते . उर्वरित ५९८ कर्मचा-यांच्‍या बाबतीत सुध्‍दा आपली हीच भूमिका असून, त्‍यांना व त्यांच्या कुटुंबीयांना न्‍याय मिळवून देण्‍यासाठी आपण वचनबद्ध आहे असे सांगतानाच या संदर्भात मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या समवेत आपली प्राथमिक चर्चाही झाली आहे. लवकरच विभागाचे सर्व वरिष्‍ठ आधिकारी आणि संस्‍थानच्‍या आधिका-यांसमवेत मुंबई येथे बैठक आयोजित करुन, तुमचे सर्व प्रश्‍न मार्गी लावू .अशी ग्‍वाही महसूलमंत्र्यांनी कर्मचा-यांच्‍या शिष्‍टमंडळास दिली.
 
याप्रसंगी दिपक तुरकणे, अनिल कोते, रामनाथ थोरात, गोटीराम दाडे, सुनिल मांजरेकर, सर्जेराव गोरे, दिपक जगताप, सुनिल गव्‍हाणे, श्री भवर यांच्‍यासह कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती