दरम्यान, महाविकास आघाडीतून बाहेर पडताना प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा आहे. आम्ही नवीन आघाडी तयार करत आहोत. मनोज जरांगेंकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, असं आम्ही मविआला सांगितलं होतं. मात्र, त्यांनी लक्ष दिलं नाही.
वंचितचा वापर ते घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते. त्यामुळे आम्ही आता वेगळा निर्णय घेत आहोत. या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होणार आहे, हे मला माहीत आहे. मात्र मी लोकांची नस ओळखतो, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता.