औरंगजेबाची कबर हवीच कशाला? - नितेश राणे

शुक्रवार, 20 मे 2022 (08:31 IST)
औरंगजेबाच्या कबरीला मनसेने आक्षेप घेतल्यानंतर या कबरीला संरक्षण देण्यात आलं आहे. ही कबर पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. त्यावरून पुन्हा एकदा टीका करण्यात आली आहे.कबर बंद केली जात असेल तर ती हवीच कशाला, असा प्रश्न भाजप नेते नितेश राणे यांनी विचारला आहे. 
 
"औरंगजेबाच्या कबरीसमोर माथा टेकवणाऱ्यांना आपण दोन पायावर जाऊ देतो हीच आपली शोकांतिका आहे. संभाजी महाराजांचा ज्यांनी छळ केला त्यांची कबर हवीच कशाला," असा प्रश्नही त्यांनी पुढे उपस्थित केला.
 
नितेश राणे यांनी ही भूमिका घेतल्यानंतर मराठा क्रांती मोर्चानेही याबाबत ठाम भूमिका घेतली आहे. औरंगजेबाची कबर कायमस्वरुरपी बंद करा, ओवैसी यांना महाराष्ट्रात येण्यास बंदी घालावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती