व्हिडीओ पोस्ट करताना संजय राऊत म्हणतात.......

गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (22:00 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी धावत जाऊन खुर्ची आणत असल्याच्या फोटोवरुन होणाऱ्या भाजपा नेत्यांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याने वाद झाला आहे. यावरुन भाजपा नेते आक्रमक झाले असून पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. यादरम्यान संजय राऊत यांनी एक ट्वीट करत आपल्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.
 
संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. योगी आदित्यनाथ यांनीही याआधी एकदा एका मुलाखतीच्या शेवटी या शब्दाचा वापर केला होता. दरम्यान ही शिवी नसून आसाममधील लाखो आदिवासींचं आडनाव आहे अशी माहिती या व्हिडीओत पुढे देण्यात आली आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, “दुनिया में चुतियोंकी कमी नही, एक ढूंढोतो हजार मिलेंगे…जरा योगिजी को सुनिये..”.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती