या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 लोक होते, ज्यांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बिपीन रावत यांच्या विमानाला तामिळनाडूमधील कुन्नूर इथं अपघात झाला होता.
आता हे हेलिकॉप्टर कोसळण्याआधी नेमकं काय घडलं हे दाखवणारा पहिला व्हिडिओ समोर आला असून यात हेलिकॉप्टर हवेत असतानाच समोर असलेल्या दाट धुक्यांमध्ये गेल्याचं पाहायला मिळतं आहे. यानंतर काहीच क्षणांत हेलिकॉप्टरच्या इंजिनचा आवाज बंद होत असताना कळून येत असल्याचे म्हटलं जातं आहे. या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.