पूरपरिस्थितीत मार्गदर्शन करण्यासाठी राज्यपाल आहेत कुठे?

गुरूवार, 14 जुलै 2022 (14:56 IST)
पूरपरिस्थितीत मार्गदर्शन करण्यासाठी राज्यपाल आहेत कुठे?, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रातील महापूरामध्ये जवळपास १०० च्या आसपास लोकं वाहून गेले आहेत. तसेच मृत्यूही पावली आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये क्वालराचं थैमान आहे. तिथेही लोकं मृत्यूमुखी पडत आहे. अशावेळी या राज्यात सरकार अस्थिर आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जरी शपथ घेतली असली तरी सरकार अस्तित्वात आलं असं होत नाही. हे सरकार बेकायदेशीर असून सर्वोच्च न्यायालयाने याबाबत सुनावणी ठेवली आहे. यातील अनेक आमदार त्या गटात गेले असून ते अपात्र ठरू शकतात. त्यांच्यावरती अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यांना मंत्रिपदाची शपथ देणं हे घटनाबाह्य आहे. या राजद्रोह आणि भ्रष्टाचार आहे. याची भिती असल्यामुळे त्यांना शपथ घेण्यापासून रोखण्यात आलं आहे. 
 
राज्यपालांनी कोणत्याही प्रकारचं घटनाबाह्य कृत्य करू नये. अशा प्रकारचं पत्र शिवसेनेतून राज्यपालांना देण्यात आलं आहे. कालपर्यंत घटनेचं पालन केलं नाही, त्यामुळे आता तरी करा. आमचे राज्यपाल कुठे आहेत. सरकार आणि मंत्रिमंडळ अस्तित्वात नाहीत. त्यामुळे आता राज्यपालांनी मार्गदर्शन करावं, असं राऊत म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती