चालू आर्थिक वर्षांच्या उत्तरार्धात, ऑक्टोबरपासून किमती स्थिरावू लागतील आणि महागाई संबंधी स्थिती हळूहळू सुधारताना दिसेल, असा विश्वास रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शनिवारी व्यक्त केला.
पुरवठय़ाच्या आघाडीवर अनुकूल स्थिती दिसत असून, एप्रिल ते जून २०२२ या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची फेरउभारी दर्शविणारे ठळक निर्देशकांची आकडेवारी पाहता, आर्थिक वर्ष २०२२-२३च्या उत्तरार्धात महागाईत हळूहळू उतार दिसू शकेल, असे मध्यवर्ती बँकेचे अनुमान असल्याचे गव्हर्नरांनी सांगितले.