जेव्हा लोकमान्य आगरकर यांना म्हणतात तुमचे ऐकायला हवे होते - राज यांचे मार्मिक चित्र

सोमवार, 21 जानेवारी 2019 (16:28 IST)
राज ठाकरे त्यांचे काका बाळसाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे व्यंगचित्रकार आहेत. काही दिवसांत राज यांनी भाजपा सरकार, प्रधानमंत्री आणि अमित शहा यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. अनेक चित्र अशी होती की ती अनेकदा जिव्हारी लागली होती. मात्र यावेळी राज यांनी मार्मिक चित्र काढत समाज व्यवस्था, जात धर्म आणि राजकारणी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्या मार्फत त्यांनी समजावर जोरदार टीका केली आहे. लोकमान्य टिळक असते तर ते गोपाळ गणेश आगरकरांना म्हणाले असते, की आजची परिस्थिती पाहता मला तुमचं म्हणणं पटतंय; प्रथम समाज सुधारणा हव्यात मग स्वातंत्र्य! असा मथितार्थ असलेले व्यंगचित्र राज ठाकरे यांनी चितारले आहे. टेंबू, कराड येथे आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली या घटनेचा उल्लेख करत राज यांनी सदर व्यंगचित्र काढले असून त्यांनी सध्या देशाला भेडसावत असलेल्या विविध समस्यांचा उल्लेख या व्यंगचित्रात केला आहे. बँकांना लुटून फरार झालेले उद्योगपती, महिलांवरील वाढते अत्याचार, शिक्षणाचा खालावलेला दर्जा, धार्मिक तसेच जातीय संघर्ष, बेरोजगारी असे विविध भीषण प्रश्न पार्श्वभूमीवर दाखवत लोकमान्य टिळकांनी आज असते तर समाजसुधारक आगरकरांच्या भूमिकेचं एका शतकानंतर समर्थन केले असते असे राज ठामपणे म्हणत आहेत, हे चित्र सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाले असून अनेकांनी जातिवाद ही कीड आहे असे म्हटले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती