राज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला

शनिवार, 19 जानेवारी 2019 (16:28 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने मोदींना छळले, म्हणून मोदी जनतेला छळत असल्याचा टोला राज ठाकरे यांनी या व्यंगचित्रातून लगावला आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरवर नरेंद्र मोदींवर निशाणा साधणारे व्यंगचित्र शेअर केले आहे. या व्यंगचित्रात राज ठाकरेंनी मोदींच्या विधानाचा दाखला दिला. गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला काँग्रेसने छळले होते, असे मोदींनी म्हटले होते. या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र रेखाटले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती