काय सांगता,सलाईन मध्ये झुरळ

शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (15:40 IST)
हा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्हातीळ बार्शी येथे एका रुग्णालयात घडला आहे.या रुग्णालयात रुग्णाला दिल्या जाणाऱ्या सलाईन मध्ये झुरळ सापडलंय. 
प्रकरण असे आहे की सोलापूरच्या एका रुग्णालयात एका तीन वर्षाच्या मुलीला सलाईन देण्यात आले होते.सलाईन वारंवार बंद पडल्यामुळे ते बंद का पडत आहे तपासल्यावर त्या सलाईनमध्ये चक्क झुरळ असल्याचे समजले.आणि त्यामुळे वेळीच सलाईन बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
 
या बाबत रुग्णालय प्रशासनाकडे जाब विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.ती चिमुकली आता पूर्णपणे बारी असून तिला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती