धूप मंदिरात दाखवण्याची 100 वर्षांची कोणती परंपरा आहे, पुरावा द्या, तुषार भोसले यांचे राऊत यांना आव्हान

सोमवार, 22 मे 2023 (21:25 IST)
त्र्यंबकेश्वर मंदिर वाद प्रकरणी ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी भूमिका मांडली की, मंदिरामध्ये संदलची धूप दाखवण्याची 100 वर्षांची परंपरा आहे. या वक्तव्यावर उत्तर देताना भाजपा अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले  यांनी संजय राऊत यांना आव्हान केले की, धूप मंदिरात दाखवण्याची 100 वर्षांची कोणती परंपरा आहे याचा त्यांनी पुरावा द्यावा.
 
तुषार भोसले म्हणाले की,  अनेक माध्यमांतून स्थानिक शांतता समितीची  पत्रकार परिषद दाखवली गेली. यात ते दावा करतात की, अशी परंपरा जुनी आहे. पण माझं चॅलेंज आहे ती पत्रकार परिषद नीट ऐकली तर त्याच स्थानिकांनी ज्यांनी ती शांतता समितीची पत्रकार परिषद घेतली त्यांच्याच परिषदेमधले वाक्य आहे की, ही परंपरा जुनी आहे, पण धूप चौकात दाखवण्याची परंपरा आहे, अशी माहिती तुषार भोसले यांनी दिली.
 
चौकात धूप दाखवण्याची परंपरा आम्ही परंपरा बघत आलो आहोत. पण यावर्षी हे लोक मंदिराच्या गेटवर का गेले हे आम्हाला कळले नाही आणि गेले असतील तर मंदिर समितीच्या सुरक्षा रक्षकांनी का अडवले नाही . म्हणून संजय राऊतांचे दात घशात घालण्याचे काम शांतता समितीने केले आहे. त्यामुळे संजय राऊतांना माझं आव्हान आहे त्यांनी पुरावा द्यावा ही धूप मंदिरात दाखवण्याची 100 वर्षांची कोणती परंपरा आहे. धूप चौकात दाखवण्याची परंपरा उरुसला, संदलला असू शकते, पण आमच्या मंदिरात येण्याची, मंदिराच्या  पायऱ्यावर आणि प्रवेशद्वारावर धूप दाखवण्याची कोणतीही परंपरा नाही, म्हणून संजय राऊतांचा दावा स्पेशल खोटा आहे, असे आरोप तुषार भोसले  यांनी केला.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती