काय सांगता, 16 लाखाला चक्क शाळा विकली, फसवणुकीचा गुन्हा दाखल

बुधवार, 20 जुलै 2022 (13:47 IST)
शिक्षण संस्थेचा अध्यक्ष असल्याचे सांगून एका चोरट्याने एक इंग्रजी शाळा एका डॉक्टरला 16 लाखाला विकून फसवण्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद येथे समोर आला आहे. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वनाथ तरटे (55 रा.एन -6 सिडको) असे या आरोपीचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. अफसर खान जुम्मा खान (रा. रोशनगेट,आझम कॉलनी) यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. मी एका शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. असे सांगितले. चक्क दुसऱ्याची शाळा डॉ. अफसरखान यांना आरोपीने 19 ऑगस्ट ते आजतायागत अश्वघोष शैक्षणिक व व्यायाम शाळा संस्थेचा अध्यक्ष असून संस्थेची स्प्रिंगडेल इंग्लिश स्कूल विक्री करण्याचे सांगितले. त्या शाळेला विकत घेण्याची तयारी डॉ. खान यांनी दर्शवली. शाळा विक्रीचा सौदा 16 लाखात ठरला आणि त्यांच्यात करार झाला. आरोपीं ने चक्क दुसऱ्याची शाळा डॉ खान यांना फसवून विकली. त्यानंतर आरोपी हा कोणत्याही संस्थेचा अध्यक्ष नसून आपली फसवणूक झाल्याचे डॉ. खान यांना लक्षात आले आणि त्यांनी आरोपीच्या विरोधात सिटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती