वीकेंड लॉकडाऊन फारसं प्रभावी नाही- केंद्राने महाराष्ट्राला सांगितलं

मंगळवार, 6 एप्रिल 2021 (18:40 IST)
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात वीकेंड लॉकडाऊन फारसं प्रभावी ठरत नाही असं केंद्राने महाराष्ट्राला सांगितलं होतं. राज्यात वीकेंडला पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र या निर्णयापूर्वी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत राज्याने यासंदर्भात मौन बाळगलं होतं. 
 
लॉकडाऊन लागू करण्यापेक्षा कठोर पद्धतीने कंटेनमेंट रोखण्यावर भर व्हावा असं केंद्राने सुचवलं होतं. नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन या गोष्टींचा मर्यादित प्रभाव पडतो. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून राज्यातल्या गंभीर परिस्थितीसंदर्भात विचारणा केली होती.
 
देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण राज्यात सापडत आहेत. देशातल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 55.11 टक्के रुग्ण राज्यात आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती