Weather Report : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गुरुवारी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील. त्यामुळे राजधानीत दिवसभर थंडी आणखी वाढेल. गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण असेल. पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की, देशात काही ठिकाणी 3 फेब्रुवारीपासून ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस थंडीपासून दिलासा मिळणार नसल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीचा जोर कमी होईल. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून थंडीची लाट सुरू आहे.
विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात जाणवेल. मुंबईसह कोकणातही थंडी वाढली आहे. या भागात काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, देशात 3 फेब्रुवारीला दिल्लीसह उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.