राज्यसभेतील सहा जागांसठी लवकरच निवडणूक होणार आहे. त्यात भाजपचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येण्याचं संख्याबळ पक्षांकडे आहे.
नांदेड येथे पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, "राज्यसभेचा निकाल प्रत्येक पक्षाची किती ताकद आहे यावर अवलंबून आहे. महाविकास आघाडीतील इतर पक्षांशी अद्याप चर्चा केलेली नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य निवडून यायला कोणतीही अडचण नाही. त्याची मतांची गरज भागून राष्ट्रवादीकडे 10.12 मतं जादा शिल्लक राहतात. शिवसेना आणि काँग्रेसचीही परिस्थिती तशीच आहे. त्यामुळे उर्वरित मतं आम्ही सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंना देऊ."
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार निवडून येऊन महाविकास आघाडीकडे 27 मतं शिल्लक राहतात. तसंच पाठिंबा दिलेल्या आमदारांचे संख्याबळ मिळून महाविकास आघाडीकडे एकूण 46 मतं शिल्लक राहतात.