'जयंत पाटील यांचा 2024 च्या निवडणुकीत पराभव करू' - चंद्रकांत पाटील

रविवार, 13 जून 2021 (10:20 IST)
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याने 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना 2024 च्या निवडणुकीत घरी पाठवू असा दावा केला आहे.
 
ते म्हणाले, "कार्यकर्ते सोबत असतील तर 2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव करू. सर्वांनी एकजुटीने काम केले तर हे सुद्धा शक्य आहे."
 
इस्लमापूर येथील नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुलाच्या कार्यक्रमानिमित्त चंद्रकांत पाटील कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. त्यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावरही निशाणा साधला.
 
यापूर्वी संभाजीराजे यांनी आपण भाजपचे खासदार नसून राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्याचं म्हटलं होतं. या वक्तव्याला प्रत्युत्तर देत चंद्रकांत पाटील म्हणाले, की संभाजीराजे मान्य करत नसले तरी ते ऑनपेपर भाजपचे खासदार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती