सलाम कॉन्स्टेबल रेहाना

शनिवार, 12 जून 2021 (18:32 IST)
कोरोना विषाणू साथीचा रोग सर्वांसाठी संकट घेऊन आला आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे अनेकांना आपल्या जवळच्या लोकांना गमवावे लागले आहे.याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे अनेकाना आपली नोकरी गमवावी लागली आहे त्यामुळे त्यांच्या वर संकटाचे सावट आले आहे.अशा संकटकाळी अनेकांनी समाजसेवा करून लोकांना मदतीचा हातभार लावला आहे आणि वेळोवेळी त्यांची मदत केली आहे. या साथीच्या आजारामुळे कित्येक लोक अनाथ झाले आहे. 
 
अशा लोकांना मदतीचा हात देण्यासाठी समाजातील काही चांगली  माणसे पुढे आली त्यापैकी एक आहे महिला कॉन्स्टेबल रेहाना शेख. यांनी कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेकांना मदत केली.त्यांनी गरजूंना ऑक्सिजन  रक्त ,प्लाझ्मा पुरवले .त्यांनी या काळात आपल्या आई-बाबाना गमावलेल्या तब्बल 50 अनाथ मुलांना सांभाळण्याची जबाबदारी  घेऊन त्यांची इयत्ता 10 वी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी देखील घेतली आहे.
 
आपल्या या कार्याबाबद्दल त्या सांगतात की मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी तयारी करताना रायगड जिल्ह्यातील वाजेतालुक्यात असलेल्या या ज्ञानी विद्यालयाची माहिती मिळाली तिथे भेट दिल्यावर समजले की या मुलांना आपल्या मदतीची कितीतरी गरज आहे.हे बघून मी माझ्या मुलीच्या वाढदिवसासाठी जमा केलेले पैसे या मुलांच्या शिक्षणासाठी देण्याचा विचार केला.
 
त्यांच्या या कार्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
त्यांना समाजकार्याची खूप आवड असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या या समाजकार्यामुळे त्यांच्या पतीने त्यांचे नाव मदर तेरेसा ठेवले आहे. त्यांच्या या कारकिर्दीला सलाम.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती