येत्या 2024 ला 30 कोटी मतं आणि 400 च्या पुढे जागा जिंकायच्या आहेत - चंद्रकांत पाटील

शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (21:20 IST)
2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचं सरकार आलं. त्यावेळी भारतीय जनता पक्षाला 17 कोटी मतं मिळाली होती. त्या निवडणुकीत भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत भाजपला 22 कोटी मतं तर 303 जागा मिळाल्या.
 
आता 2024 च्या निवडटणुकीत भाजपला देशात 30 कोटी मतं पाहिजेत आणि जागा 400 च्या पुढे जिंकायच्या आहेत, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. भाजप उद्योग आघाडीच्या बैठकीत पाटील बोलत होते.
 
पण 272 जागांनाच बहुमत मिळतं तर 400 जागा का हव्यात, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण काही कायदे असे आहेत की ज्यासाठी संसदेत पक्षाला तीन चतुर्थांश बहुमत असणं गरजेचं असतं. त्यामुळे भाजपला 30 कोटी मतं लागतील. उद्योग आघाडी सह इतर सर्व आघाड्यांना पक्षाची मतं वाढवावी लागतील. आपण लोकांची मदत करत असताना त्यांना भाजपच्या कमळाशी जोडावं लागेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती