विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे आहे, त्यावर काँग्रेसचा हक्क : थोरात

शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (15:54 IST)
विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे आहे, त्यावर काँग्रेसचा हक्क आहे व या पदावर काँग्रेसच्याच व्यक्तीची नियुक्ती होईल, असा दावा काँग्रेसचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.
 
विधिमंडळाचे अधिवेशन एक मार्चपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी आठ-दहा दिवस आधी तिन्ही पक्षांतील पदाधिकारी एकत्र बसून आम्ही याबाबत निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. विधानसभेचे अध्यक्ष असताना नाना पटोले यांनी मतपत्रिकांचा वापर करण्याचा निर्णय घेतला. तो योग्यच आहे. मतपत्रिका मतदान यंत्रांपेक्षा विश्वासार्ह आहेत. लोकशाहीसाठी प्रगत असलेले देशही मतपत्रिकांचा वापर करत आहेत, याकडे थोरात यांनी लक्ष वेधले.
 
प्रदेशाध्यक्षपदी अन्य व्यक्तीची निवड झाली म्हणून आपल्याला वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. कारण मी काँग्रेसच्या अखिल भारतीय कार्य समितीचा सदस्य आहे. इतरही अनेक पदे माझ्याकडे आहेत. त्यामुळे एखादे पद सहकाऱ्याला दिल्यास वाईट वाटण्याचे कारण नाही, असेही थोरात म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती