वरिष्ठांना खुश करण्यासाठी आपण काय बोलावं याचा तारतम्य असायला हवं. -गिरीश महाजन

शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (08:16 IST)
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच “पान टपरीवाल्याला गोधडी दाखवतो,” असं प्रत्युत्तर दिलं. यावर आता भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते शुक्रवारी (९ सप्टेंबर) जळगावमध्ये माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.
 
गिरीश महाजन म्हणाले, “चंद्रकांत खैरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. गुलाबराव पाटीलही मंत्री आहेत आणि वरिष्ठ आहेत. चंद्रकांत खैरेंनी बोलताना तोल सांभाळला पाहिजे. वरिष्ठांना खुश करण्यासाठी आपण काय बोलावं याचा तारतम्य असायला हवं. आपला जुना सहकारी किंवा कुणीही इतर पक्षाचा असेल, त्यांच्याविषयी बोलताना संयम ठेवला पाहिजे.”
 
“चंद्रकांत खैरे माझे मित्र आहेत”
“सध्या राजकारणाचा स्तर इतका खालवत चालला आहे की, त्याला पुन्हा एकदा सावरण्याची सांभाळण्याची गरज आहे. चंद्रकांत खैरे माझे मित्र आहेत. मी खैरेंना फोन करून सांगेन की यापुढे बोलताना थोडं तारतम्य बाळगा,” असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती