लातुरला पाणी पुरवठा करणार्या मांजरा धरणात अत्यल्प पाणीसाठा आही. असे असले तरी घाबरुन जाण्याचे कारण नाही. पाण्याचा जपून वापर केल्यास येणार्या जून महिनाअखेर आठ दिवसाला पाणी पुरवता येईल. नागरिकांनी नळाला तोट्या बसवून घ्याव्यात, काही ठिकाणी तांत्रिक दोषामुळे आठ-आठ तास पाणी सुरु असते. आपले भरुन झाल्यास हे नळ बंद करावेत. प्रशासन एकटे काही करु शकत नाही. त्याला नागरिकांची साथ हवी असे आवाह्न स्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे यांनी केले. मुख्यत्वे पाणी पुरवठा प्रश्नावर आयोजित स्थायी समितीच्या बैठकीत ते बोलत होते. पाणी पुरवठ्याच्या कामातील यांत्रिकीकरणाचा विषय या बैठकीत मार्गी लागला. धरणात पाणी आल्यास दोन दिवसाआड किंवा चार दिवसाआड पाणी पुरवठा करु असेही गोजमगुंडे म्हणाले. आजच्या बैठकीच्या विषयपत्रिकेवर एकूण ११ विष होते.