यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी केली की, शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या कृषीमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, सोयाबीन आणि धानाला भाव द्यावा. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बोलताना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर कडक टीका केली. ते म्हणाले की, निवडणुकीच्या वेळी महायुतीने कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आता कर्जमाफीसाठी समिती नेमण्याची चर्चा सुरू आहे. पण शेतकऱ्यांना समिती नको असेल तर थेट कर्जमाफी झाली पाहिजे. असे देखील ते यावेळी म्हणाले.