कोरोना च्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आणि राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमावलीनुसार आता मंदिरात प्रवेश मिळणार आहे. सप्तश्रींगी देवीचे दर्शन घेण्यासाठी लसीकरण असणे आवश्यक आहे. लसीचा पहिला किंवा दुसरा डोस ज्याने घेतला असेल त्यालाच श्री सप्तशृंगी मातेचं दर्शन घेता येणार आहे. मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी ई-पास असणे गरजेचे आहे. विश्वस्त संस्थेने www.ssndtonline.org या संकेतस्थळावर इ-दर्शन पास उपलब्ध करून दिला आहे. ज्या भाविकांना दर्शन घ्यायचे असेल त्याने या वेबसाईटवर जाऊन आपली माहिती नोंदवून इ-पास तयार करून घेणे बंधनकारक आहे.